Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


इस्राएलची मुक्तता

1 त्या दिवशी, याहवेह त्यांच्या तलवारीने शिक्षा करतील— त्यांची हिंसक, मोठी आणि शक्तिशाली तलवार— लिव्याथान सरपटणारा सर्प, गुंडाळून घेणारा सर्प लिव्हियाथान; ते समुद्रातील या राक्षसाचा वध करतील.

2 त्या दिवशी— “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा:

3 मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.

4 मी रागावलेलो नाही. परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; मी त्या सर्वांना आग लावली असती.

5 नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

6 येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, इस्राएलला अंकुर फुटेल आणि ती बहरेल आणि सर्व जगास फळांनी भरेल.

7 याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? तिला मारण्यात आले आहे का, ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का?

8 रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता— जसे एखाद्या दिवशी पूर्वेचा वारा वाहतो, तसे त्यांच्या हिंसक स्फोटाने ते तिला घालवून देतात.

9 तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.

10 तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.

11 जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.

12 त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.

13 आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan