Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तुतिगीत

1 त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेह, मी तुमची स्तुती करेन, जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता, तरी तुमचा राग दूर झाला आहे आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.

2 निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”

3 तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.

4 त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.

5 याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; हे सर्व जगाला माहीत करून द्या.

6 सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan