Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


लोकांचा खोटा पश्चात्ताप

1 “चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील.

2 ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्‍या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू.

3 चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”

4 “एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते.

5 म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो.

6 कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे.

7 आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.

8 गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.

9 जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, तसेच याजकांच्या टोळ्या शेखेमाच्या वाटेवर वध करतात, ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात.

10 मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे: एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे, इस्राएल अपवित्र झाला आहे.

11 “हे यहूदाह, तुझ्यासाठी हंगामाची वेळ नेमलेली आहे. “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन,

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan