Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


आशीर्वाद प्राप्तीसाठी पश्चात्ताप

1 हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!

2 परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.

3 अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”

4 “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.

5 मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;

6 त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.

7 लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.

8 हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”

9 कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan