१ इतिहास 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबिन्यामीन शौलाची वंशावळी 1 बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठपुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह, 2 चौथा नोआह व पाचवा राफा. 3 बेलाचे पुत्र: अद्दार, गेरा, अबीहूद, 4 अबीशूवा, नामान, अहोआह, 5 गेरा, शेफूफान व हुराम. 6 एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते: 7 नामान, अहीयाह व गेरा यास कैद करून पाठविण्यात आले. गेराचे पुत्र उज्जा व अहीहूद. 8 शहरयिमाने आपल्या पत्नी हुशीम व बारा यांच्यापासून घटस्फोट घेतला व मोआब देशामध्ये त्याला पुत्र झाले. 9 त्याची पत्नी होदेशच्या पोटी झालेले पुत्र: योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, 10 यऊस, शख्याह व मिर्माह. हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते. 11 हुशीमेपासून त्यास झालेले पुत्र अबीतूब व एल्पाल. 12 एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली), 13 बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले. 14 अहियो, शशक, यरेमोथ, 15 जबद्याह, अराद, एदर, 16 मिखाएल, इश्पाह व योहा हे बरीयाहचे पुत्र. 17 जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, 18 इश्मरय, इज्लीयाह व योबाब हे एल्पालाचे पुत्र. 19 याकीम, जिक्री, जब्दी, 20 अलीएनय, सिलथाई, एलीएल, 21 अदायाह, बरीयाह व शिम्राथ हे शिमीचे पुत्र. 22 इश्पान, एबर, एलीएल, 23 अब्दोन, जिक्री, हानान, 24 हनन्याह, एलाम, अनथोथीयाह, 25 इफदयाह व पेनुएल हे शशकाचे पुत्र. 26 शमशेराय, शहर्याह, अथल्याह, 27 यारेश्याह, एलीयाह व जिक्री हे यरोहामाचे पुत्र. 28 हे त्यांच्या पिढीतील कुटुंबप्रमुख असून ते यरुशलेम येथे राहात असत. 29 गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह. 30 त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, 31 गदोर, अहियो, जेखर 32 आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. 33 नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. 34 योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला. 35 मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. 36 आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा. 37 मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. 38 आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र. 39 त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत. 40 ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.