Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


लेवी

1 लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

2 कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

3 अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

4 एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,

5 अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,

6 उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,

7 मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,

8 अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,

9 अहीमाजास अजर्‍याह, अजर्‍याहास योहानान,

10 योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.

11 अजर्‍याहास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब झाला,

12 अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,

13 शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

14 अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.

15 याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.

16 लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

17 ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी.

18 कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

19 मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे:

20 गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह,

21 जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय.

22 कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,

23 अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,

24 अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.

25 एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ.

26 एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब,

27 एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.

28 शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.

29 मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,

30 त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.


मंदिराचे संगीतकार

31 कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

32 यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.

33 ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

34 जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,

35 जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,

36 जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,

37 जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र,

38 जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.

39 हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,

40 जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,

41 जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,

42 जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,

43 जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,

44 आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,

45 जो हशब्याहाचा पुत्र, जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र,

46 जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, जो शेमेरचा पुत्र,

47 जो महलीचा पुत्र, जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र.

48 त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते.

49 अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.

50 अहरोनाचे वंशज: अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,

51 त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह,

52 त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍याह, त्याचा पुत्र अहीतूब,

53 त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.

54 हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):

55 यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.

56 पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.

57 अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,

58 हीलेन, दबीर,

59 आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.

60 बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.

61 अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली.

62 गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.

63 मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.

64 इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली.

65 त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.

66 एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:

67 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,

68 योकमेअम, बेथ-होरोन,

69 अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.

70 तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.

71 गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह;

72 इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ,

73 रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;

74 आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,

75 हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;

76 नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.

77 लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;

78 यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,

79 केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली;

80 आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,

81 हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan