Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


यहूदाहची इतर कुळे

1 यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.

2 शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.

3 एटामाचे पुत्र: येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती.

4 पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता.

5 तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या.

6 नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती.

7 हेलाचे पुत्र: सेरथ, जोहर व एथ्नान

8 व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली.

9 याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले.

10 याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.

11 शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता.

12 एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.

13 केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.

14 मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.

15 यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: इरु, एलाह व नाआम. एलाहचा पुत्र: केनाज.

16 यहल्लेलेलचे पुत्र: जीफ, जीफा, तिर्‍या व असरेल.

17 एज्राहचे पुत्र: येथेर, मेरेद, एफेर व यालोन. मेरेदची एक पत्नी बिथ्याने मिर्याम, शम्मय व इश्बह यास जन्म दिला. इश्बह एष्टमोवाचा पिता होता.

18 मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला.

19 नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले.

20 शिमओनाचे पुत्र: अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. इशीचे वंशज: जोहेथ व बेन-जोहेथ.

21 यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली.

22 तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.)

23 हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत.


शिमओन

24 शिमओनाचे वंशज: नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल;

25 शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा.

26 मिश्माचा वंशज: त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी.

27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.

28 त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल,

29 बिल्हा असेम, तोलाद,

30 बेथुएल, होरमाह सिकलाग,

31 बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.

32 त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि

33 या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते. त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे:

34 मेशोबाब, यामलेख, अमस्याहाचा पुत्र योशाह,

35 योएल. येहू योशिब्याहचा पुत्र, जो सेरायाहचा पुत्र, जो असिएलाचा पुत्र होता.

36 एलिओएनाइ, याकोबाह, यहोशायाह, असायाह, अदिएल, यशीमिएल, बेनाइयाह.

37 जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.

38 नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला.

39 ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्‍यापर्यंत गेले.

40 तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत.

41 ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.

42 त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.

43 तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan