Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


दावीदाचे पुत्र

1 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.

2 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.

3 पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला.

4 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेममध्ये दावीदाने तेहतीस वर्षे राज्य केले.

5 यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा हिच्यापासून झाले.

6 नंतर इभार, एलीशुआ, एलिफेलेत.

7 नोगा, नेफेग, याफीय,

8 एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते.

9 या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.


यहूदीयाचे राजे

10 शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट,

11 त्याचा पुत्र यहोराम, त्याचा पुत्र अहज्याह, त्याचा पुत्र योआश,

12 त्याचा पुत्र अमस्याह, त्याचा पुत्र अजर्‍याह, त्याचा पुत्र योथाम,

13 त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीयाह, त्याचा पुत्र मनश्शेह,

14 त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीयाह.

15 योशीयाहचे पुत्र: ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीयाह, व चौथा शल्लूम.

16 यहोयाकीमाचे पुत्र: यकोन्याह, व सिद्कीयाह.


बंदिवासात गेल्यानंतरचे राजघराणे

17 बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र: शल्तीएल,

18 मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह.

19 पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.

20 त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.

21 हनन्याहचे पुत्र: पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह.

22 शखन्याहचे वंशज: शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र.

23 निरय्याहचे पुत्र: एलिओएनाइ, हिज्कीयाह व अज्रीकाम, एकूण तीन पुत्र.

24 एलिओएनाइ याचे पुत्र: होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan