Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


मंदिराचे संगीतकार

1 दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:

2 आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.

3 यदूथून व त्याचे पुत्र: गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.

4 हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.

5 (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)

6 हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत.

7 ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते.

8 तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.

9 पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

10 तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

11 चौथी इज्री, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

12 पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

13 सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

14 सातवी यसारेलाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

15 आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

16 नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

17 दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

18 अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

19 बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

20 तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

21 चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

22 पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

23 सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

24 सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

25 अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

26 एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

27 विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

28 एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

29 बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

30 तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

31 चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan