Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


आदामापासून अब्राहामापर्यंतची ऐतिहासिक नोंदी नोआहच्या पुत्रांपर्यंत

1 आदाम, शेथ, अनोश,

2 केनान, महलालेल, यारेद,

3 हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.

4 नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.


याफेथाचा वंश

5 याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.

6 गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

7 यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.


हामाचा वंश

8 हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.

9 कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.

10 कूश निम्रोदचा पिता होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.

11 इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

12 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.

13 कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ,

14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

15 हिव्वी, आर्की, सीनी,

16 अर्वादी, समारी व हमाथी.


शेमचे वंश

17 शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.

18 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.

19 एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

20 योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

21 हदोराम, ऊजाल, दिक्लाह,

22 ओबाल, अबीमाएल, शबा,

23 ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.

24 शेम, अर्पक्षद, शेलाह,

25 एबर, पेलेग, रऊ,

26 सरूग, नाहोर, तेरह,

27 व अब्राम (अर्थात् अब्राहाम).


अब्राहामाचे कुटुंब

28 अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल.


हागारचे वंशज

29 हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

30 मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,

31 यतूर, नापीश आणि केदमाह. हे इश्माएलचे पुत्र होते.


केटूराहचे वंशज

32 अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.

33 मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह. हे सर्व केटूराहचे वंशज होते.


साराहचे वंशज

34 अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.


एसावाचे पुत्र

35 एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.

36 एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.

37 रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.


एदोम मधील सेईराचे लोक

38 सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान.

39 लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.

40 शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.

41 अनाहचा पुत्र: दिशोन. दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.

42 एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.


एदोमाचे शासक

43 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

44 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

45 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

46 हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

47 मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

48 सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.

49 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

50 बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.

51 हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,

52 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

53 केनाज, तेमान, मिब्सार,

54 मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी होते.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan