जखर्या 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)उडता पट 1 मी पुन्हा डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, एक उडता पट दृष्टीस पडला. 2 त्याने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उडता पट दिसतो, त्याची लांबी वीस हात व रुंदी दहा हात आहे.” 3 तो मला म्हणाला, “ह्या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे; चोरी करणार्या सर्वांना ह्या लेखानुसार एका बाजूने घालवतील व खोटी शपथ वाहणार्या सर्वांना ह्या लेखानुसार दुसर्या बाजूने घालवतील. 4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्यांचे भस्म करील.” एफातली स्त्री 5 मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत पुढे येऊन मला म्हणाला, “आता आपले डोळे वर करून काय जात आहे ते पाहा.” 6 मी विचारले, “हे काय आहे?” तो म्हणाला, “ही चालली आहे ती एक एफा1 आहे.” आणखी त्याने म्हटले की, “ही सर्व देशभर त्यांचे प्रतिरूप आहे.”2 7 मी आणखी पाहिले तेव्हा शिशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. 8 मग तो म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे.” तेव्हा त्याने तिला एफामध्ये कोंबून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसवले. 9 मग मी डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, दोन स्त्रिया निघाल्या, त्यांच्या पंखांत वारा भरला होता; त्यांचे पंख करकोच्याच्या पंखांसारखे होते; त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी ह्यांच्या मधल्या मार्गाने नेली. 10 मग माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “ते ती एफा घेऊन कोठे जात आहेत?” 11 तो मला म्हणाला, “शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती एफा ते नेत आहेत; ते तयार झाले म्हणजे ती तेथे तिच्या स्थानी स्थापतील.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India