Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

जखर्‍या 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यरुशलेम व इतर राष्ट्रे

1 पाहा, परमेश्वराचा दिवस येत आहे; त्या दिवशी तुझी लूट तुझ्या वस्तीत वाटून घेतील.

2 यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रांना जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटतील, स्त्रियांना भ्रष्ट करतील; अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत.

3 तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील.

4 आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्वपश्‍चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल.

5 तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्‍याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.

6 आणि त्या दिवशी असे होईल की, प्रकाश असणार नाही; प्रकाशमान ज्योती विरघळून जातील.

7 तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरालाच ठाऊक; तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल; तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील.

8 त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील; अर्धे पूर्वसमुद्राकडे व अर्धे पश्‍चिमसमुद्राकडे वाहतील; उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल.

9 तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील.

10 तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल.

11 लोक त्यात वस्ती करतील; ह्यापुढे त्यावर शाप राहायचा नाही; तर ते निर्भय असे वसेल.

12 तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल.

13 त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्‍याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्‍याच्या हाताशी प्रतिकार करील.

14 यहूदाही यरुशलेमेत युद्ध करील; आसपासच्या सर्व राष्ट्रांतील धन जमा होईल; सोने, रुपे व पोशाख ह्यांचा पूर लोटेल.

15 तसेच ह्या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल.

16 आणखी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व, राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपाचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरुशलेमेस वर जातील.

17 आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांच्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.

18 तसेच मिसराचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठवणार ती ह्यांच्यावरही येईल.

19 मिसरास व मंडपांचा सण पाळण्यास वर चढून जाणार्‍या सर्व राष्ट्रांना हीच शिक्षा होईल.

20 त्या दिवशी घोड्यांच्या घंटांवर परमेश्वराला पवित्र अशी अक्षरे असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातली बहुगुणी वेदीपुढल्या यज्ञांच्या कटोर्‍यांसारखी होतील.

21 यरुशलेमेतील व यहूदातील प्रत्येक बहुगुणे सेनाधीश परमेश्वराला पवित्र होईल; व सर्व यज्ञकर्ते येऊन ती घेतील व त्यांत अन्न शिजवतील; त्या दिवसांपासून पुढे सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात कोणी व्यापारी1 असणार नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan