Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

प्रकटी 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बलवान दूत व लहानसे पुस्तक

1 मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.

2 त्याच्या हातात एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;

3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले.

4 त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली : “सात मेघगर्जनांनी काढलेले ‘शब्द गुप्त ठेव,’ ते लिहू नकोस.”

5 ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने ‘आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,

6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले’, आणखी अवकाश लागणार नाही;

7 तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल.

8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे.”

9 तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानसे पुस्तक’ मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, “हे घे ‘आणि खाऊन टाक’; ‘ते तुझे पोट कडू’ करील, तरी ‘तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”’

10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ते लहानसे पुस्तक’ घेतले ‘व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले,’ तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.

11 तेव्हा ते मला म्हणाले, “अनेक ‘लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू’ पुन्हा ‘संदेश दिला पाहिजेस.”’

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan