Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 99 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वर इस्राएलाशी विश्वासू आहे

1 परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.

2 परमेश्वर सीयोनेत थोर आहे; तो सर्व लोकांहून परम थोर आहे.

3 ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे.

4 राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.

5 परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे.

6 त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

7 मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.

8 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.

9 परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan