Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 93 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराचे माहात्म्य

1 परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.

2 तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादि कालापासून आहेस.

3 हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे; नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे.

4 विपुल जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे.

5 तुझे निर्बंध अभंग आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan