स्तोत्रसंहिता 87 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)सीयोनेत राहण्याचा मान कोरहपुत्रांचे संगीतस्तोत्र. 1 परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे. 2 याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत. 3 हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात; (सेला) 4 राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी विदित करीन; पाहा, पलेशेथ, सोर व कूश म्हणतात, ह्याचा जन्म तेथलाच. 5 सीयोनेविषयी म्हणतील की, हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. 6 लोकांची नावनिशी करताना ह्याचा जन्म तेथलाच, असे परमेश्वर लिहील. (सेला) 7 गायन व नृत्य करणारे म्हणतील : “माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India