Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 83 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना
एक गीत; आसाफाचे संगीतस्तोत्र.

1 हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस.

2 कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.

3 ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात.

4 ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”

5 कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;

6 तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी,

7 गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;

8 अश्शूरही त्यांना सामील झाला आहे; त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे. (सेला)

9 मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केलेस, तसे त्यांना कर;

10 ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.

11 ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर.

12 ते म्हणतात, “देवाची निवासस्थाने2 आपल्या ताब्यात घेऊ या.”

13 हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्‍याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.

14 अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते,

15 त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.

16 हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.

17 ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत;

18 म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan