स्तोत्रसंहिता 70 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मुक्ततेसाठी प्रार्थना ( स्तोत्र. 40:13-17 ) मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र. 1 हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर. 2 जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत. 3 मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत. 4 तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “देवाचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत. 5 मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India