Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 64 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.

1 हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैर्‍याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर.

2 दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपव.

3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे.

4 ते त्याच्यावर अकस्मात मारा करतात; ते भीत नाहीत.

5 ते आपला दुष्ट संकल्प दृढ करतात; पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबुज करतात; “आम्हांला कोण पाहणार?” असे ते म्हणतात.

6 ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे,

7 तरी देव त्यांच्यावर तीर सोडील; ते अकस्मात घायाळ होतील.

8 त्यांचीच जीभ त्यांना प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील; त्यांना पाहणारे सर्व जण डोके हलवतील.

9 तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.

10 परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan