स्तोत्रसंहिता 60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना ( स्तोत्र. 108:6-13 ) मुख्य गवयासाठी; शूशन एदूथ (साक्षीचे भूकमल) ह्या चालीवर शिक्षणासाठी गायचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र. तो अराम-नहराईम व अराम-सोबा ह्यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोर्यात अदोमातले बारा हजार पुरुष मारले तेव्हा रचलेले. 1 हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण. 2 तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहे; तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे. 3 तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस; 4 तुझे भय बाळगणार्यांना तू ध्वज दिला आहेस; अशासाठी की, तो त्यांनी सत्यासाठी फडकवावा. (सेला) 5 तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक. 6 देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन; 7 गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे; 8 मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार.” 9 मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? 10 हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. 11 शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे. 12 देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India