Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे, मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र.

1 अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?

2 नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1

3 मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात.

4 त्यांच्या ठायी सर्पाच्या विषासारखे विष असते; जो बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे ते आहेत;

5 मांत्रिक कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले, तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही.

6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.

7 वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.

8 सरपटताना विरघळत जाणार्‍या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.

9 तुमच्या पातेल्यांना कांटेर्‍या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो, शिजलेले असो, ते तो वावटळीने उडवून देईल.

10 सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल; दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल,

11 तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan