स्तोत्रसंहिता 57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)छळणार्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना ( स्तोत्र. 105:1-5 ) मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. 1 हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन. 2 परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्या देवाचा मी धावा करीन. 3 तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे; (सेला) देव आपली दया व सत्य पाठवून देईल. 4 माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन. 5 हे देवा, आकाशांहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो. 6 माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. (सेला) 7 हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. 8 हे माझ्या जिवा, जागृत हो, हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन. 9 हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन; 10 कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. 11 हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India