Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा
( स्तोत्र. 14:1-7 )
मुख्य गवयासाठी; महलथ ह्या चालीवर गायचे दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).

1 मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही.” लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करतात; सत्कृत्य करणारा कोणी नाही.

2 कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले.

3 ते एकूणएक मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकंदर सर्व बिघडले आहेत; सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही.

4 दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव घेत नाहीत.

5 पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.

6 देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan