Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव अखिल पृथ्वीचा राजा
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे स्तोत्र.

1 अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.

2 कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

3 तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो.

4 त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला)

5 जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.

6 देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.

7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.

8 देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.

9 राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan