Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना

1 हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.

2 कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस; तू माझा का त्याग केलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?

3 तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत;

4 म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.

5 हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan