Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.

1 हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचांतून मोकळे केले आहेस; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.

2 अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? (सेला)

3 तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.

4 त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)

5 नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ करा; परमेश्वरावर भाव ठेवा;

6 “आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड.

7 धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस.

8 मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan