Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


प्रातःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीद आपला पुत्र अबशालोम ह्याच्यापुढून पळाला त्या प्रसंगीचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत

2 ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)3

3 तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.

4 मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला)

5 मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.

6 लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांना भिणार नाही,

7 हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.

8 तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan