Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्‍यांसारखी माझी गती होईल.

2 मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्‍याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक.

3 मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.

4 त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे, त्यांचे पारिपत्य कर; त्यांचे प्रतिफळ त्यांना दे.

5 परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती, ते ध्यानात आणीत नाहीत म्हणून तो त्यांना जमीनदोस्त करील, उभारणार नाही.

6 परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे.

7 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.

8 परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे.

9 तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan