Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 150 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराचे स्तवन करा

1 परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा.

2 त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा.

3 कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा.

4 डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.

5 खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणार्‍या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा.

6 प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan