स्तोत्रसंहिता 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी दाविदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, 3 आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजार्याची निंदा करीत नाही, 4 अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही, 5 आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India