Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 144 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.

1 परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो; तो माझ्या हातांना लढायला शिकवतो; माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.

2 तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो.

3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस?

4 मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.

5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील.

6 वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव.

7 वरून आपले हात लांब कर; व महापुरांतून, परक्यांच्या हातातून, मला सोडवून मुक्त कर.

8 त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.

9 हे देवा, मी तुला नवे गीत गाईन; दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन;

10 तूच राजांना तारण देणारा आहेस; तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस.

11 मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.

12 आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्‍यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात;

13 आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत;

14 आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत;

15 अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य! ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य!

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan