Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.

1 मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.

2 कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले;

3 ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.

4 सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.

5 पाहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकांत वस्ती करतो

6 दीनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे.

7 देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाचा उद्धार होवो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवील, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan