Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 137 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बाबेलमध्ये पाडाव करून नेलेल्यांचा आकांत

1 बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो.

2 तेथील वाळुंजांवर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या,

3 कारण तेथे आमचा पाडाव करणार्‍यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्‍यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.”

4 आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे?

5 हे यरुशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.

6 जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

7 हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”

8 हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!

9 जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य!

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan