Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 130 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराच्या द्वारे मिळणार्‍या तारणाविषयी आशा
आरोहणस्तोत्र.

1 हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे.

2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.

3 हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?

4 तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.

5 मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो.

6 पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

7 हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे;

8 तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan