स्तोत्रसंहिता 129 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)सीयोनेच्या शत्रूंचा पाडाव व्हावा म्हणून प्रार्थना आरोहणस्तोत्र. 1 आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;” 2 “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही. 3 नांगरणार्यांनी माझी पाठ नांगरली; त्यांनी आपल्या नांगरांनी लांबलांब तासे काढली.” 4 परमेश्वर न्यायी आहे; दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडली. 5 जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत. 6 धाब्यांवरचे गवत जसे वाढण्यापूर्वीच सुकून जाते तसे ते होवोत; 7 कापणार्याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणार्याच्या कवेत ते भरत नाही. 8 जवळून येणारेजाणारे त्यांना एवढेसुद्धा म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हांला प्राप्त होवो, परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India