Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 128 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराचे भय धरणार्‍याची धन्यता
आरोहणस्तोत्र.

1 जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!

2 तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

3 तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

4 पाहा, परमेश्वराचे भय धरणार्‍या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल.

5 परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.

6 तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलास शांती असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan