Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 127 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते
शलमोनाचे आरोहणस्तोत्र.

1 परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.

2 तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.

3 पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.

4 तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.

5 ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan