स्तोत्रसंहिता 126 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)परत आणल्याबद्दल उपकारस्तुती आरोहणस्तोत्र. 1 सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले. 2 तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.” 3 परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत; त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे. 4 हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हांला बंदिवासातून परत आण. 5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. 6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India