Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 125 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे
आरोहणस्तोत्र.

1 ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत.

2 यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे.

3 नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही.

4 हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.

5 जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan