स्तोत्रसंहिता 124 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती दाविदाचे आरोहणस्तोत्र. 1 आता इस्राएलाने म्हणावे की, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 2 लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 3 तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते; 4 जलांनी आम्हांला बुडवले असते; त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता; 5 खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते. 6 परमेश्वराचा धन्यवाद होवो; त्याने आम्हांला त्यांच्या दाढांत भक्ष्य म्हणून पडू दिले नाही. 7 आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशांतून मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. 8 आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला साहाय्य मिळते. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India