स्तोत्रसंहिता 123 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दयेची याचना आरोहणस्तोत्र. 1 हे स्वर्गात राजासनारूढ असणार्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो. 2 पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. 3 हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे. 4 सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India