स्तोत्रसंहिता 122 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यरुशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना दाविदाचे आरोहणस्तोत्र. 1 “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 2 हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. 3 हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. 4 इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, 5 कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. 6 यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्यांचे कल्याण असो. 7 तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” 8 माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन. 9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India