Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 120 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना
आरोहणस्तोत्र.

1 मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने माझे ऐकले.

2 “हे परमेश्वरा, लबाडी करणार्‍या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव.”

3 हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल? तुला आणखी काय मिळणार?

4 वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे.

5 हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्‍यांजवळ राहतो.

6 शांततेचा द्वेष करणार्‍यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे.

7 मी शांतताप्रिय आहे, तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan