Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 114 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आश्‍चर्यकारक निर्गमन

1 इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणार्‍या लोकांतून निघाले,

2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला.

3 हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली.

4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.

5 हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस?

6 अहो पर्वतांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता? अहो टेकड्यांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता?

7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.

8 तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan