स्तोत्रसंहिता 113 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती 1 परमेशाचे स्तवन करा!1 परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. 2 येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो. 3 सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे; त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे; 5 परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, 6 जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? 7 तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो; 8 आणि त्यांना अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. 9 तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेशाचे स्तवन करा!1 |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India