Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 100 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


उपकारस्तुती करण्याचा आदेश
उपकार मानण्याचे स्तोत्र.

1 अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा,

2 हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या.

3 परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.

4 त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.

5 कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan