स्तोत्रसंहिता 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)भाग पहिला नीतिमान व अनीतिमान 1 जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, 2 तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. 3 जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. 4 दुर्जन तसे नाहीत, ते वार्याने उडून जाणार्या भुसासारखे आहेत. 5 ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत; पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत; 6 कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India