Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएल लोकांच्या प्रवासातील टप्पे

1 मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे :

2 परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंदल्या त्या ह्या :

3 पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले; वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करत बाहेर पडले;

4 त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.

5 इस्राएल लोकांनी रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे तळ दिला.

6 सुक्कोथ येथून कूच करून रानाच्या कडेवरच्या एथामात त्यांनी तळ दिला.

7 एथामाहून कूच केल्यावर ते मागे फिरले व बाल-सफोनासमोरील पी-हहीरोथ येथे येऊन मिगदोलासमोर त्यांनी तळ दिला.

8 मग ते पी-हहीरोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात तीन दिवसांची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला.

9 मारा येथून कूच करून ते एलिमाला गेले; एलीम येथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे त्यांनी तळ दिला.

10 एलिमाहून कूच करून तांबड्या समुद्राच्या किनार्‍यावर त्यांनी तळ दिला.

11 तांबड्या समुद्रापासून कूच करून त्सीन रानात त्यांनी तळ दिला.

12 त्सीन रानातून कूच करून त्यांनी दफका येथे तळ दिला.

13 दफका येथून कूच करून त्यांनी आलूश येथे तळ दिला.

14 आलूशाहून कूच करून त्यांनी रफीदिमात तळ दिला; तेथे लोकांना प्यायला पाणी नव्हते.

15 रफीदिमाहून कूच करून त्यांनी सीनाय रानात तळ दिला.

16 सीनाय रानातून कूच करून त्यांनी किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.

17 किब्रोथ-हत्तव्वा येथून कूच करून हसेरोथ येथे त्यांनी तळ दिला.

18 हसेरोथ येथून कूच करून रिथमा येथे त्यांनी तळ दिला.

19 रिथमा येथून कूच करून त्यांनी रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.

20 रिम्मोन-पेरेस येथून कूच करून त्यांनी लिब्ना येथे तळ दिला.

21 लिब्ना येथून कूच करून त्यांनी रिस्सा येथे तळ दिला.

22 रिस्सा येथून कूच करून त्यांनी कहेलाथा येथे तळ दिला.

23 कहेलाथा येथून कूच करून त्यांनी शेफेर डोंगराजवळ तळ दिला.

24 शेफेर डोंगराजवळून कूच करून त्यांनी हरादा येथे तळ दिला.

25 हरादा येथून कूच करून त्यांनी मकहेलोथ येथे तळ दिला.

26 मकहेलोथ येथून कूच करून त्यांनी तहथ येथे तळ दिला.

27 तहथाहून कूच करून त्यांनी तारह येथे तळ दिला.

28 तारहाहून कूच करून त्यांनी मिथका येथे तळ दिला.

29 मिथका येथून कूच करून त्यांनी हशमोना येथे तळ दिला.

30 हशमोना येथून कूच करून त्यांनी मोसेरोथ येथे तळ दिला.

31 मोसेरोथाहून कूच करून त्यांनी बनेयाकान येथे तळ दिला.

32 बनेयाकानाहून कूच करून त्यांनी होर-हागिदगाद येथे तळ दिला.

33 होर-हागिदगादाहून कूच करून त्यांनी याटबाथा येथे तळ दिला.

34 याटबाथा येथून कूच करून त्यांनी अब्रोना येथे तळ दिला.

35 अब्रोना येथून कूच करून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.

36 एसयोन-गेबेराहून कूच करून त्यांनी त्सीन रान म्हणजे कादेश येथे तळ दिला.

37 कादेशाहून कूच करून त्यांनी अदोम देशाच्या सीमेवरील होर पर्वताजवळ तळ दिला.

38 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला.

39 अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.

40 कनानातील नेगेबात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने तेव्हा इस्राएल लोक आल्याची बातमी ऐकली.

41 मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला.

42 सलमोना येथून कूच करून त्यांनी पूनोन येथे तळ दिला.

43 पूनोनाहून कूच करून त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.

44 ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.

45 मग ईयीमाहून कूच करून त्यांनी दीबोन-गाद येथे तळ दिला.

46 दीबोन-गादाहून कूच करून त्यांनी अलमोन-दिबलाथाईम येथे तळ दिला.

47 अलमोन-दिबलाथाइमाहून कूच करून त्यांनी नबोसमोरील अबारीम डोंगरात तळ दिला.

48 अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला.

49 मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला.


कनानाच्या चतु:सीमा आणि त्यांची वाटणी

50 मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी परमेश्वर मोशेला म्हणाला,

51 “इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात पोहचाल,

52 तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका;

53 तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा; तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हांला दिलेला आहे.

54 तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे;

55 पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील.

56 असे झाल्यास मी जसे त्यांचे करायचे योजले आहे तसे तुमचेच करीन.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan