Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.

2 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत;

3 त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

4 आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे,

5 आणि तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा;

6 अमावस्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्यांबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पावे.

7 ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे व कसलेच काम करू नये.

8 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत;

9 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

10 आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;

11 प्रायश्‍चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबर त्याचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.

12 सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा;

13 परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत.

14 त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; तेरा गोर्‍ह्यांपैकी प्रत्येक गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

15 आणि चौदा कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;

16 तसेच पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज हे अर्पण करावे.

17 दुसर्‍या दिवशी बारा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

18 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

19 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

20 तिसर्‍या दिवशी अकरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

21 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

22 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

23 चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

24 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

25 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

26 पाचव्या दिवशी नऊ गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

27 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

28 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

29 सहाव्या दिवशी आठ गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

30 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

31 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

32 सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

33 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

34 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

35 आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा; ह्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.

36 परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे : एक गोर्‍हा, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे;

37 त्यांबरोबर गोर्‍ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

38 नित्य होमार्पण व त्यांबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.

39 तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्यांखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली, अन्नार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावीत.”

40 परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सर्वकाही इस्राएल लोकांना कळवले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan