Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मीखाह 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत.


बेथलेहेम येथून उद्धारकर्त्याचे राज्य

2 हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.

3 ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील.

4 तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.

5 हा पुरुष आम्हांला शांती होईल; जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू.

6 ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.

7 जसे परमेश्वरापासून दहिवर येते व जसा गवतावर पाऊस पडतो आणि तो मनुष्यासाठी पडण्याचा थांबत नाही, किंवा मानवजातीसाठी खोळंबून राहत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक बहुत लोकांत पसरतील.

8 वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.

9 तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल होवो, तुझे सर्व शत्रू नष्ट होवोत.

10 परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन; तुझ्या रथांचा नाश करीन;

11 तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन;

12 तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाहीत;

13 तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन, तू ह्यापुढे आपल्या हातांच्या कृतींच्या पाया पडणार नाहीस.

14 तुझ्यामधल्या अशेरामूर्ती मी उपटून टाकीन; मी तुझ्या शहरांचा नाश करीन.

15 ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan